Bhagat Singh

Bhagat Singh

Milind Gawali

2 месяца назад

26 Просмотров

2018 मध्ये 15 ऑगस्ट ला भगतसिंग आणि लोकमान्य टिळक
परत पृथ्वीवर अवतरतात आणि भारतामध्ये काय परिस्थिती झाली आहे याचं विश्लेषण करतात, काय यासाठीच आम्ही आमच्या प्राण्याची आहुती दिली होती स्वतंत्र भारत हा असाच हवा होता का आपल्याला काय चुका झाल्या आहेत आणि त्या कशा सुधारायला हव्या याच्यावर एक दूरदर्शनवर कार्यक्रम होता
संजू कोलते यांनी तो दिग्दर्शित केला होता
आणि मला भगतसिंग यांची भूमिका करायला त्यांनी मला बोलावलं
कलाकार किती स्वार्थी असतो बघा, एक कलाकार म्हणून मला आयुष्यामध्ये भगतसिंग यांची भूमिका करायची होतीच पण
या वयात ती भूमिका करायला हवी होती त्या वयात मला कोणीही भगतसिंग यांची भूमिका करायला दिली नव्हती आता वयाच्या 52 व्या वर्षी
मला ही भूमिका करायला सांगितली
वयाच्या 23 व्या वर्षी भगतसिंग यांना फाशी देण्यात आली होती, अग तेवीस वर्षाचं आयुष्य होतं भगतसिंगांचं, पण मी जसं म्हटलं की एक कलाकार स्वार्थी असतो त्यामुळे मी संजीव बोलते ना असं काही सांगितलं नाही की मी 52 वर्षाचा आहे .
मी स्वतःच्या मनाला समजावलं की मी जरी बाबांना वर्षाचा असलो तरीसुद्धा 23 वर्षाचा मी दिसतो मनाने मी 23 वर्षाचाच आहे मी भगतसिंगांची भूमिका करू शकतो आणि मी ती भूमिका स्वीकारली,
आणि मी ती खूप असतेने आणि प्रेमाने केली,
आणि सुदैवाने तिथेही कोणीही मला असं म्हटलं नाही की तू खूप मोठा दिसतो आहेस भगतसिंग तर फार लहान होता.
म्हणून मला हे अभिनेत्याचा आयुष्य खूप आवडतं कारण इतक्या विविध भूमिका जगायला मिळतात, तसं बघायला गेलं तर आपण कधी भगतसिंगांसारखा आयुष्य जगणार आहोत, आपण प्रयत्न केला तरी तसं त्याच्यासारखं जगणं शक्य नाही, वयाच्या 21व्या वर्षी 22व्या वर्षी, हसत हसत देश प्रेमासाठी फासावर जाणारे या जगामध्ये किती आहेत , 140 कोटी लोक
संख्या असलेल्या देशांमध्ये 77 वर्षांमध्ये किती भगतसिंग आपल्या देशामध्ये पैदा झालेत .
1983 84 मध्ये राजन सब्रवाल यांच्या टूथपे रिश्ते या दूरदर्शनच्या नाटकांमध्ये मला काम करायची संधी मिळाली होती त्यासाठी त्यांनी माझं दूरदर्शनवर ऑडिशन घेतलं होतं आणि आणि मी दूरदर्शनवर approved Artist
झालो होतो. ज्यावेळेला दूरदर्शन वर हे नाटक आलं त्यावेळेला आम्ही सगळ्यांनी घरी बसून ते पाहिलं आणि मला खूप छान वाटला होता, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ऑल इंडिया रेडिओ ट्रान्समिशन एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरी करत होतो त्यावेळेला दूरदर्शन वर येण्या जाण्याचे अनेक प्रसंग आले, कालांतराने अभिनेता झालो मराठी हिंदी चित्रपटांमध्ये सिरीयल मध्ये काम करायला लागलो आणि दूरदर्शनवर मुलाखतीसाठी मला बोलवण्यात आलं, एक दिवस संजू बोलते यांनी दूरदर्शनची एक मालिका ए फसा नावाची त्यात अभिनय करायला बोलावलं 52 एपिसोड त्या मालिकेचे झाले, comedy serial असल्यामुळे काम करायला खूप मजा आली, त्या एका episode मध्ये विक्रम गोखले यांनी काम केलं आणि विक्रम गोखल्यांनी मला दूरदर्शनच्या त्यांनी दिग्दर्शित केलेल्या मालिकेमध्ये घेतलं आणि पुण्यामध्ये आम्ही या मालिकेचे शूटिंग बरेच दिवस केलं, तीन समजावत असताना ते अभिनय करून दाखवायचे आणि तो अभिनय बघायला मला इतका आनंद व्हायचा मी त्यांना म्हणायचो की सर मला तुमच्यासारखा अभिनय करणं या जन्मात शक्य नाही, पण तुम्ही जे मला करून दाखवत आहात ते बघत रहावस वाटतं,
अप्रतिम कलाकार होते विक्रम गोखले, असं एक वेगळच दूरदर्शन वरचं माझं नातं आहे, मुंबई दूरदर्शनच्या माझ्या खूप अविस्मरणीय अनुभव आहे,
भगतसिंग यांची भूमिका केल्यानंतर मला दूरदर्शन मी आपल्या देशातले जितके माजी सैनिक ज्यांना राष्ट्रपती पदक मिळाली त्यांच्या मुलाखती घेण्यासाठी बोलावलं होतं, तोही कार्यक्रम अगदी भारावून टाकण्यासारखा होता,
त्यानंतर एक दिवस मला बोलवण्यात आलं मुलाखतीसाठी आणि ती मुलाखत विक्रम गोखल्यांनी माझी घेतली, त्यांनी मला कम्फर्टेबल करून बोलत केलं आणि एक तास मी मन मोकळेपणाने त्यांच्याशी गप्पा मारल्या.
ही मुलाखत युट्युब वर आपल्याला बघायला मिळेल,
खरतर मी विक्रम गोखले यांची मुलाखत घ्यायला हवी होती तर तिथे उलटच झाला आहे,
त्यानंतर एकदा मला दूरदर्शन वर पंडित जसराज बरोबर एका कार्यक्रमात सहभाग घ्यायचा योग आला,
किती सुंदर अनुभव मला दूरदर्शन मी दिले आहेत, खरच मी दूरदर्शनच्या ऋणी आहे, मला आठवतं रेडिओला जेव्हा राजीनामा दिला त्यावेळेला गायकवाड नावाचे स्टेशन डायरेक्टर होते ते मला म्हणाले होते का सोडतो आहेस रेडिओ तो दूरदर्शन ला ट्रान्सफर करून घेतोस का तिथे तुझं मन रमेल,
आणि किती बरं झालं मी दूरदर्शन वर नोकरी केली नाही, सरकारी नोकर म्हणून जर मी दूरदर्शनवर काम केलं असतं तर असे अनुभव माझ्या वाटेला आले नसते,
एका कलाकाराला जे अनुभव येतात ते अविस्मरणीय असतात कदाचित सरकारी नोकराला तू कधीच मिळत नाही.
आज अचानक भगतसिंग या भूमिकेची व्हिडिओ क्लिप मिळाली आणि या सगळ्या आठवणी माझ्या डोळ्यासमोरून गेल्या.
दूरदर्शन से भव्य दिव्य स्टुडिओज रेकॉर्डिंग
एक खूप वेगळे विश्व आहे
ज्यांनी कधी दूरदर्शन पाहिलं नाही त्यांना त्याची कदाचित कल्पना येणार नाही, दूरदर्शन मधला चहा कॅन्टीन मधलं जेवण, त्याच्या गेटच्या आत मध्ये एक विश्व आहे
जसं गुगल आणि नेटफ्लिक्स सर विश्व आहेत तसचं.
दूरदर्शनवर माझ्या नावाच्या दोन सिरीयल आहेत प्रोड्युसर म्हणून निर्माता म्हणून . एडवोकेट शालिनी आणि मनस्विनी,
आणि अजूनही मला असं वाटतं की मी दूरदर्शनवर फार काम केलेलं नाही आहे.
Ссылки и html тэги не поддерживаются


Комментарии: